Saturday, September 17, 2011

बाहुली कुणासाठी ?

काल खूप दिवसांनी खेळण्यांच्या दुकानात गेलो होतो.
रविवारी बालवाडितल्या पालकांसाठी कार्यशाळा आहे, म्हणूण काही खेळणी मला घ्यायची होती.
त्याठिकाणीच भेटली सलोनी.
सलोनीला बाहुली घ्यायची होती पण कुठली बाहुली घ्यावी हे काही तिला कळत नव्हतं.तिला एकावेळी सगळ्याच बाहुल्या आवडायच्या तर दुसर्‍यावेळी कुठल्याच नाहीत.
त्यामुळे सहाजजिकच तिच्या आईची सहनशक्ती संपू लागली. आता घे कुठलीतरी बाहुली आणि चल असं म्हणू लागली.
आईने सलोनीशी खूप घासाघीस केल्यावर, शेवटी तीन पैकी एक बाहुली घ्यायचं ठरलं.
पण कुठली? हे काही ठरेना.
लहान मुलीवर संतापणारी आई पाहिल्याने, मी या प्रकरणात मधे पडायचं ठरवलं.
मी सलोनीला म्हणालो,आपण एक आयडिया करुया.या तिनही बाहुल्यांना तू विचार की आमच्या घरी येणार का?
जी बाहुली हो म्हणेल तिला घरी घेऊन जा.
सलोनीने तीघींना विचारलं. त्यातली गुलाबी बाहुली चटकन हो म्हणाली.सलोनीने लगेच तिला उचलून घेतलं.छातीशी घट्टं धरलं.
पण ही गुलाबी बाहुली, तिच्या आईला काही फार आवडली नव्हती.तिच्या आईचा जीव तर निळ्या बाहुलीत गुंतला होता.आई काही निळ्या बाहुलीचा हट्ट सोडायला तयार नाही. आणि सलोनी ती गुलाबी बाहुली खाली ठेवायला तयार नाही.
मग शेवटि तिच्या आईला विनंती केली की, तुम्हाला हर ही बाहुली इतकीच आवडली असेल तर ती तुमच्यासाठी घ्या नां! पण मुलांना आपल्याला आवडतील तीच खेळणी घेऊ दे की.
हे ऐकताच त्या माऊलीने माझ्याकडे रागारागात पाहिलं.ती निळी बाहुली दूर ढकलंत ती बाजूला झाली.
खरं सांगा.. ..
यात माझं काही चुकलं असं वाटतंय का तुम्हाला?

5 comments:

  1. राजीवकाका नो चूक, सलोनी नो चूक, आई पण नो चूक, पण थोडा पेशन्स येस आणि कल्पकता येस..!!!
    -अभिजित

    ReplyDelete
  2. बर्‍याच पालकांची गल्लत होते. आपल्या मुलांवर स्वत:ची अनेक मतं लादत असतात. त्यातूनच प्रश्न निर्माण होतात.

    ReplyDelete
  3. काही चुकलं नाही हा काका एकदम बरोबर :)

    ReplyDelete
  4. लोकांना कसकसला राग येतो, ह्याची गणती करणं शक्य नाही. शाळांमधे आजकाल समुपदेशक असतात. एखाद्याचा पाल्याचा रागरंग पाहून उदा- शाळेत जातो म्हणून घरी सांगायचे आणि शाळेत जायचेच नाही. आणि कुणाबरोबर बाहेर फिरत बसणे असे प्रकार मुले आणि मुली दोघेही करतात- त्यांच्या पालकांना शाळेत बोलावुन परीस्थितीची सांगीतली जाते. आणि सुचवले जाते की, त्या विद्यार्थ्याला समुपदेशकाकडे पाठवण्यात येणार आहे. असे सांगितल्यावर त्या पालकांना राग येतो. काहीबाही बोलु लागतात. वगैरे.. मी सुचवले की त्यांना समुपदेशक म्हणू नका. वेगळे काहीतरी स्वीकारले जाईल असे नाव द्या. काय आहे की, लोकांना चकचकीत कागदाचे कव्हर लावुन काहीही विकत घ्यायची सवय असेल तर चांगल्या वस्तूंनाही उठाव येण्यासाठी असेच करावे लागते.

    ReplyDelete
  5. Your advice was perfectly right ! That must be seen in some different angle. Elders can enjoy childhood twice. First is their original and second with their children. They can flush out their anger , frustration , tension while enjoying this second childhood...They can enjoy the life in fresh mood.It means Saloni must buy blue doll for her, that is good for her mental health....vijay

    ReplyDelete